प्रस्तावना

३ जानेवारी २००२ - या दिवशी कलवड वस्ती लोहगाव रोड पुणे ३२ ला ठिकाणी संस्थेचे मीटिंग पार पाडण्यात आली. सर्वानुमते दीपस्तंभ संस्था स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. १५ मार्च २००२ या दिवशी......

संस्थेचे प्रस्तावना३ जानेवारी २००२

३ जानेवारी २००२ - या दिवशी कलवड वस्ती लोहगाव रोड पुणे ३२ ला ठिकाणी संस्थेचे मीटिंग पार पाडण्यात आली. सर्वानुमते दीपस्तंभ संस्था स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. १५ मार्च २००२ या दिवशी संस्थेची कार्यकारणी धर्मादाय आयुक्त पुणे या ठिकाणी सादर करण्यात आली व ४ जून २००२ या दिवशी संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.

४ जून २००२

४ जून २००२ या रोजी दीपस्तंभ संस्थेची स्थापना झाली. संस्थेची स्थापना डॉ. वृषाली सुरेंद्र रणधीर यांनी केली. ज्यावेळी संस्थेची स्थापना झाली त्यावेळी डॉ. वृषाली रणधीर स्वतः अध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या. सौ सुरेखा राजेंद्र खरे या सचिव म्हणून तर सौ. रंजना मच्छिंद्र गायकवाड या खजिनदार म्हणून काम पाहत होत्या.

१२ जून २००२

१२ जून २००२ या दिवसापासून संस्थेचे बँक खाते बँक ऑफ बडोदा येथे सुरू करण्यात आले. महिलांचा आर्थिक कौटुंबिक विकास कशाप्रकारे करता येईल यावर संस्थेचे कामकाज सुरू झाले. १ जानेवारी २००२ रोजी कलवड वस्ती येथे स्वच्छता अभियान शिबिर सुरू करण्यात आली यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

२९ मे २००२

२९ मे २००२ पासून गरीब होतकरू, धुणी-भांडी, मोलमजुरी, करणाऱ्या महिलांसाठी केसनंद या ठिकाणी स्वस्त दरात व हप्त्याने राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.

८ जानेवारी २००२

८ जानेवारी २००२ पासून महिलांसाठी बचत गट सुरू करण्यात आले. संकल्प, आकांशा, धनश्री, प्रेरणा, मुक्ती, स्वप्नपूर्ती विविध बचत गट सुरू करण्यात आले. बचत गटातून महिलांना आर्थिक फायदा मिळावा या हेतूने गटातून महिलांना विविध प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये अगरबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण व स्टार पावडर तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

२ जानेवारी २००३

२ जानेवारी २००३ - संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान संस्थेमार्फत कलवड वस्ती या ठिकाणी घेण्यात आले यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

१५ जानेवारी २००३

१५ जानेवारी २००३ - या दिवशी संस्थेचा प्रथम वर्धापन दिन कलवड वस्ती या ठिकाणी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रा. रंजना गुड्डी, सौ. शीला वाकोडे, प्रा. लतिका जाधव, सौ. सुरेखा खरे, सौ. शेलार मॅडम उपस्थित होत्या. या प्रसंगी महिलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, रांगोळी स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा आयोजित करण्यात केल्या होत्या. साकल्या चव्हाण या मुलीने “मी सावित्रीबाई फुले बोलतेय” हा एकपात्री प्रयोग सादर केला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजयी स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. याच कार्यक्रमात महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.

८ मार्च २००३

८ मार्च २००३ - या दिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. लहान मुलांचे व महिलांचे डान्स, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. विजयी स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. हा कार्यक्रम कलवड वस्ती व प्रायव्हेट रोड या ठिकाणी घेण्यात आला.

२६ मार्च २००३

२६ मार्च २००३ - या दिवशी उद्योजकता व रोजगार निर्मितीसाठी महिलांचे शिबिर घेण्यात आले.( खादी ग्रामोद्योग के. व्ही. आय. सी.)

२९ मार्च २००३

२९ मार्च २००३ - या दिवशी जनजागृती मेळावा घेण्यात आला. सेंद्रिय शेती व गांडूळ खत उत्पादन उपयोग सौजन्य केंद्रीय मधमाशा पालन तथा प्रशिक्षण केंद्र खादी ग्रामोद्योग आयोग पुणे यांच्या वतीने घेण्यात आला. शेळीपालन, मधमाशापालन व गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण हे या कार्यक्रमात घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपस्थिती –
1. श्री. निलेश घरमरकर - इनोरा संस्था
2. श्रीमती भांडोरकर - इनोरा संस्था
3. शोभा तायडे - मार्जिन मनी संस्था
4. श्री. तायडे - मार्जिन मनी संस्था
5. श्री. लेनिन – (के. व्ही. आय. सी. )
6. श्री. वाकोडे - खादी ग्रामोद्योग
शेळी पालन प्रशिक्षण हे महाराष्ट्र कृषी व ग्रामीण विकास केंद्र संचालित हांबिरराव मोझे ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेतर्फे कलवड येथे घेण्यात आले.

३ मे २००३

३ मे २००३ या दिवशी महिलांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर कळवड येथे संस्थेमार्फत आयोजित केले गेले.
यामध्ये प्रमुख उपस्थिती –
१. डॉ. पी. टी. गायकवाड, २. डॉ. दलाल, ३. डॉ. शोभा भोसले, ४. डॉ. सिद्धार्थ धेंडे, ५. डॉ. जानराव डॉक्टर उपस्थित होते.

८ मार्च २००४

८ मार्च २००४ - जागतिक महिला दिनानिमित्त भाजी मंडई वडापाव सेंटर चालू करण्यात आले.

१५ जानेवारी २००५

१५ जानेवारी २००५ - संस्थेचा तिसरा वर्धापनदिन साजरा केला. यामध्ये संगीत, खुर्ची, चमचा लिंबू, लहान मुले व महिलांसाठी डान्स स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यात आला.

१५ जानेवारी २००६

१५ जानेवारी २००६ - संस्थेचा वर्धापन दिन साजरा केला. यामध्ये संगीत खुर्ची, चमचा लिंबू, लहान मुले व महिलांसाठी डान्स स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यात आला.

१५ जानेवारी २००७

१५ जानेवारी २००७ - संस्थेचा पाचवा वर्धापन दिन साजरा केला.

१२ जून २००७

१२ जून २००७ - रोजी दीपस्तंभ बचत गटामार्फत पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. गेनू भाऊ खेसे प्राथमिक विद्यालय व खांदवे पडळ या शाळेत पोषण आहार पुरवला जात होता.

२००८ २००९

२००८ २००९ - या यावर्षीही संस्थेने भरपूर प्रमाणात उपक्रम राबवले सांस्कृतिक कार्यक्रम घेतले.

७ जुलै २०१०

७ जुलै २०१० - रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार व बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यामध्ये कलवड वस्ती लोहगाव, सिद्धार्थ नगर, प्रायव्हेट रोड येथील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींचे तसेच विभागातील उच्च शिक्षित महिला व पुरुष यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित मान्यवर नागरवस्ती विकास योजनेचे प्रमुख श्री. ज्ञानेश्वर मोळसकर, श्री. महाजन सर, समूह संघटिका सौ. उषा कांबळे मॅडम तसेच विभागातील नगरसेविका सौ चाँदबी नदाफ सामाजिक कार्यकर्ता सुमन ताई गायकवाड, विठ्ठल गायकवाड संस्थेचे डॉ. वृषाली रणधीर, महिला कमिटी, सर्व महिला बचत गट, पुरुष बचत गट उपस्थित होते.

१० जुलै २०१०

१० जुलै २०१० – रोजी कलवड येथे अगदी कागदी पिशव्या ट्रेनिंग महिलांसाठी घेण्यात आले.

जून २०१०

जून २०१० मध्ये वाडेगाव येथे इंग्रजी माध्यमाची बालवाडी अंतर्गत गावातील मुले मुली यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून संस्थेने मुलांसाठी इंग्लिश मीडियम नर्सरी शाळा सुरू करण्यात आली. शैक्षणिक कामासाठी खालील व्यक्तींचा सहभाग होता.
प्रणोती प्रशांत रणधीर, जयश्री विजय शिंदे, उज्वला बाळासाहेब शेलार, आरती गणेश निकाळजे.

१ डिसेंबर २०१० ते ७ डिसेंबर २०१०

१ डिसेंबर २०१० ते ७ डिसेंबर २०१० - या कालावधीत वाडेगाव येथील पर्यटन यात्रा सुरू करण्यात आली. त्यामध्ये गावाचा विकास व गावाला आर्थिक लाभ घेता येईल. या दृष्टीने संस्थेने हे काम पाहिले.

२० मार्च २०११

२० मार्च २०११ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त चमचा लिंबू, संगीत खुर्ची, स्मरणशक्ती, बिंदी लावणे, बादलीत बॉल टाकणे इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. व विजयी स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

७ जुलै २०११

७ जुलै २०११ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पारितोषिक वितरण समारंभ, तसेच यामध्ये दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कलवड वस्ती व प्रायव्हेट रोड या ठिकाणी सदर कार्यक्रम पार पाडण्यात आला.

३ जानेवारी २०१२

३ जानेवारी २०१२ रोजी सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आणि संस्थेच्या दशकपूर्ती सोहळा निमित्त महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये दिनांक ३.१.२०१२ रोजी कलवड, वाडेगाव प्रायव्हेट रोड येथे रॅली काढण्यात आली. दिनांक ४.१.२०१२ रोजी निबंध स्पर्धा, दिनांक ५.१.२०१२ रोजी पथनाट्य, दिनांक ६.१.२०१२ रोजी वक्तृत्व स्पर्धा, दिनांक ७.१.२०१२ रोजी पाककला स्पर्धा, दिनांक ८.१.२०१२ रोजी गायन कला स्पर्धा, दिनांक ९.१.२०१२ रोजी रांगोळी स्पर्धा, दिनांक १०.१.२०१२ रोजी चित्रकला स्पर्धा, दिनांक ११.१.२०१२ रोजी सुंदर घर स्पर्धा दिनांक १२.१.२०१२ रोजी पुणे विद्यापीठामध्ये महिला बचत गटाचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये रमाई बचत गटांनी हुंडाबळी या विषयावर पथनाट्य सादर केले व पुणे विद्यापीठामार्फत महिला बचत गटाचा सन्मान करण्यात आला.

२८ जानेवारी २०१२

२८ जानेवारी २०१२ - रोजी संस्थेच्या सर्वसाधारण वार्षिक सभा निमित्त कार्यक्रम घेण्यात आले. यात महिलांची व मुलांची संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. महिलांसाठी हळदी कुंकू उखाणे घेण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. महिला बचत गटातील महिलांना स्त्री भ्रूणहत्या या विषयावर सदर सुंदर पथनाट्य सादर केले.

११ मार्च २०१२

११ मार्च २०१२ - रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.

७ जुलै २०१२

७ जुलै २०१२ - रोजी दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार बक्षीस वितरण समारंभ कलवड व प्रायव्हेट रोड येथे करण्यात आला.

२ ऑगस्ट २०१२

२ ऑगस्ट २०१२ - रोजी रक्षाबंधन निमित्त राखी विक्रीचा स्टॉल लावण्यात आला.

२४ ऑक्टोबर २०१२

२४ ऑक्टोबर २०१२ - रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी वाडेगाव येथे “खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम घेण्यात आला. या मध्ये चमचा लिंबू, बादलीत बॉल टाकणे, बिंदी लावणे, केसात स्ट्रॉ च्या नळ्या गुंफणे, दांडिया नृत्य, महिला व लहान मुलांचे डान्स इतर कार्यक्रम घेऊन विजयी महिला स्पर्धकांना पैठणी पारितोषिके देण्यात आली.

१४ नोव्हेंबर २०१२

१४ नोव्हेंबर २०१२ - रोजी बालदिना निमित्त कलवड प्रायव्हेट रोड येथे लहान मुलांच्या स्लो सायकल स्पर्धा, लहान मुला मुलींचा डान्स व बक्षीस वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

२४ व २५ नोव्हेंबर २०१२

२४ व २५ नोव्हेंबर २०१२ - शिक्षण भवन येथे महिलांचा सॅंडविच विक्रीचा स्टॉल लावण्यात आला व नेहरू युवा केंद्र मार्फत बचत गटातील महिलांचा सत्कार व गौरव करण्यात आला.

२६ नोव्हेंबर २०१२ ते ६ डिसेंबर २०१२

२६ नोव्हेंबर २०१२ ते ६ डिसेंबर २०१२ - संविधान दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र व दिपस्तंभ संस्थेमार्फत महिलांचे सविधान वाचन कार्यक्रम घेण्यात आले. महिलांना कायद्याची माहिती व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला व हा कार्यक्रम कलवड, वाडेगाव, प्रायव्हेट रोड येथे घेण्यात आला.

१६ ते २२ डिसेंबर २०१२

१६ ते २२ डिसेंबर २०१२ - या कालावधीत आंध्र प्रदेश तिरुकुरू ( विजयवाडा ) येथे युथ क्लब एक्सचेंज प्रोग्राम तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला १) अमोल गौतम मोरे व २) समाधान विक्रम मस्के या दोन् युवकांनी पुरुष बचत गटामार्फत रॅलीमध्ये सहभाग घेतला होता.

३१ डिसेंबर २०१२

३१ डिसेंबर २०१२ लहान मुलांचा डान्स स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ कलवड येथे पार पडला.