आमच्याविषयी

महिला विकास - महिलांसाठी स्वालंबन वर्ग आणि प्रशिक्षण केंद्र चालवणे, गरजू व होतकरू महिलांसाठी स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करणे.

संस्थेचे ध्येय आणि उद्देश(अ) सामाजिक कार्य :

१) महिला विकास - महिलांसाठी स्वालंबन वर्ग आणि प्रशिक्षण केंद्र चालवणे, गरजू व होतकरू महिलांसाठी स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करणे.

२) महिलांचे बचत गट तयार करणे.

३) बचत गटामार्फत उद्योग शिबिरे व्यवसाय संबंधी मार्गदर्शन करणे.

४) उद्योगांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे.

५) सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या उपक्रमांच्या योजना चालविणे.

६) प्रकल्प भेटी आयोजित करणे.

७) पर्यावरण विषयक संरक्षण व संवर्धनातील कार्यक्रम राबविणे.

८) समाज हिताच्या दृष्टीने शिबिरे, चर्चासत्रे, मेळावे, स्नेहसंमेलने, प्रदर्शने इत्यादी उपक्रम राबविणे.

९) समाजहिताच्या दृष्टीकोनातून महिला व पुरुष यांच्यासाठी वृद्धाश्रम व तत्संबंधी योजना राबविणे.

१०) दुर्बल घटकांसाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या आयोजनामध्ये समन्वयाची भूमिका पार पाडणे

११) घर बांधणी संबंधीच्या योजनांना मदत करणे.

१२) नागरवस्ती विकास योजना च्या सहकार्याने विविध कल्याणकारी उपक्रम राबविणे.

१३) हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, स्त्रियांचे प्रश्न या विषयी जाणीव निर्माण करणे.

१४) बालविकास - परिसरातील बालकांच्या विकासासाठी संस्कार वर्ग चालवणे व त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रकाशात आणण्यासाठी विविध स्पर्धा प्रदर्शने आयोजित करणे. शैक्षणिक सहली आयोजित करणे, क्रीडांगण आणि उद्यानाची सोय करणे.

१५) परिसर स्वच्छता पर्यावरण विकासाबाबत कार्यक्रम राबविणे.(ब) शैक्षणिक कार्य :

१) संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये शिक्षण संस्था सुरु करणे व तळागाळातील लोकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची शैक्षणिक मदत करणे.

२) होतकरू विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पेढी चालविणे.

३) विद्यार्थ्यांसाठी अभ्यास वर्ग चालविणे.

४) प्रौढ शिक्षण वर्ग चालविणे.

५) वाचनालय, ग्रंथालय चालविणे.

६) संगणक विषयक शिक्षण व प्रशिक्षण देणे.

७) बालवाडी, अंगणवाडी, क्रीडा इ. शिबीर घेणे.

८) एकात्मिक बाल विकास योजना दीपस्तंभ च्या माध्यमातून राबविणे.

९) पूर्व माध्यमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, त्यासाठी शाळा, महाविद्यालये सुरु करणे.

१०) गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे साहित्य उपलब्ध करून देणे.

११) शिक्षण प्रसाराच्या योजना हाती घेऊन त्या राबविणे.

१२) वक्तृत्व, निबंध स्पर्धा, नाट्य स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा आयोजित करणे.(क) आरोग्यविषयक कार्य :

१) आरोग्य विषयक विविध उपक्रम राबविणे.

२) अंध, अपंग, मतिमंद व मूकबधिरांचे विषयी विकासात्मक व पुनर्वसनात्मक विविध उपक्रम राबविणे.

३) आपत्कालीन आरोग्य तपासणी सेवा उपलब्ध व्हावी याकरिता योजना त्मक प्रयत्न करणे.

४) भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, यासारख्या प्रसंगांमध्ये मदत करणे.

५) रक्तदान शिबिरे, कुटुंब नियोजन शिबिरे आयोजित करणे.

६) परिसर स्वच्छता विषयक उपक्रम राबविणे.

७) विविध खेळांचे सामने आयोजित करणे.

८) परिसर स्वच्छता, पर्यावरण विकासाबाबत कार्यक्रम राबविणे.(ड) राष्ट्रीय कार्य :

१) निरनिराळे राष्ट्रीय सण साजरे करणे, उदाहरणार्थ १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, महाराष्ट्र दिन, थोर व्यक्तींच्या जयंती व पुण्यतिथी यासारखे उत्सव साजरे करणे व यातून राष्ट्रप्रेम, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता, सामाजिक एकता यांचा प्रसार करणे.

२) केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या योजनांचा तपशील सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावा या दृष्टीने कार्य करणे व त्याची अंमलबजावणी करणे.

३) राष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी गोरगरीब जनतेसाठी जाहीर होणार या योजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने त्या योजनांची माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करणे.

४) वृद्ध व अनाथ व दुर्बल घटकांसाठी कार्य करणे.

आमच्या दिपस्तंभ संस्था संस्थेचे ब्रीदवाक्य

स्वप्न गरिबांचे - शून्यातून विश्वाकडे, ध्येय संस्थेचे - बचतीकडून समृद्धीकडे

संस्थापक व संस्थेचे मार्गदर्शक

आयु. रंजना मच्छिंद्र गायकवाड

अध्यक्ष

आयु. पंचशिला रमेश हरिभक्त

उपाध्यक्ष

आयु. वृषाली सुरेंद्र रणधीर

सचिव

आयु. सरिता जीवन परदेशी

खजिनदार

आयु. दीपा उदय रणधीर

सभासद

आयु. जयश्री महेंद्र गायकवाड

सभासद

आयु. मंजुश्री सुभाष कांबळे

सभासद

आयु. प्रणोती प्रशांत रणधीर

सभासद

आयु. वैशाली राजेश बेंगळे

सभासद

आयु. वंदना विष्णू सोनवणे

सभासद

आयु. रेश्मा सुरेश रणदिवे

सभासद